आमदार सतीश चव्हाण यांची नगराध्यक्ष जन विश्वास कार्यालयास सदिच्छा भेट

देगलूर प्रतिनिधी
पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी देगलूर नगर परिषद नगराध्यक्ष यांच्या जन विश्वास कार्यालय येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी बालाजी टेकाळे यांच्या वतीने आमदार सतीश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अंकुश देसाई, शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार, मनोज तोटावर, नंदू शेठ शाखावार, बबलू टेकाळे, व्यंकट कांबळे, दिगंबर कडलवार, सुमित कांबळे, नाना मोरे, पाशाभाई, योगेश मैलागिरे, बालाजी मैलागिरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
